Saturday, February 6, 2010

उद्या

माझ्या रस्त्यांवर तू मदमस्त चांदणं
घेऊन येतोस
माझ्या या सुरांमध्ये विष अमर्याद
खोल डोहाच्या अंधारा सारखे
संपलेल्या आठवणी मी वाटतोय
वेशी वरच्या गुरांना.

Saturday, January 23, 2010

गाठी

कुठे ह्या गाठी सुटल्या?
कोणत्या शेजारी मी हरवले माझे स्वप्न?
हा मावळतीचा वारा येणाऱ्या शब्दांना गुंगावतो
अगडबंब रस्ते भुरळ पडतात
आणि दोघे दोघांच्या गर्दीत हरवतात.

Sunday, January 3, 2010

भूरजी पाव

अख्खं महाभारत त्याच्या तव्यावर
उतरले आहे.
बारा अंडी, ढोभर कांदा
ढीगभर मसाला.
त्याच्या काविल्त्याने तो रणांगण वाजवतो
आणि हजारो पावांचे
मुडदे पडतात.

बाजार

हिरमुसलेला शांत वारा
थकलेली जमीन टुउबलाईटच्या
सफेद प्रकाशात चमकते.
कांदा बटाटे तांबाटी,
सारंगा, सूरमई, आणि खाजा.
एक हवालदार, चार दारूची दुकाने,
आणि असंख्य पहिले माजले.
बाजार भरलाय.

गाव सोडताना

थकलेल्या विजेच्या तारा,
जुंपलेले मावळतीचे कुंपण,
माझ्या ध्यानीमनी येते.
कंटाळलेल्या वाटा घरी जातात,
दबतदबत.
गावचं सुसाट वारं
कोण जाणे कुठे खेळतं.
दहा दुकाने, पाच घरं,
एक तलाव, पाठी सोडून चाललोय मी.